पुण्यात करोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार - गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात 


पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)


             


     पुण्यात कल्पनाने कहर माजविला असून  कोरोनाबाधित आणि मृत्यूची संख्या वाढत असून, कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना, एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. आकुर्डी येथील एका रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि महिला सुरक्षा रक्षकासह तिघे जण यात सामील आहेत. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
      एका तरुणाच्या आईला करोनाचा संसर्ग झाला होता. आकुर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू तिचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना, तिला चार इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यावेळी केवळ दोनच इंजेक्शन मिळू शकले. अन्य दोन इंजेक्शनसाठी आरोपींना १५ हजार रुपये द्यावे लागले होते. याचा राग येऊन काही दिवसांनी मित्राच्या मदतीने या तिघांना पकडण्याचे त्याने ठरवले. मित्राचे वडील पण कोरोनाबाधित असून, त्यांना इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे त्याने सांगून  तिघा आरोपींना पैसे दिले. त्यानंतर या तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, बुधवारी सकाळपासून या प्रकरणाची महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामागील सूत्रधार कोण असेल याचा तपास पोलिस अधिक करत आहेत.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image