महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती यांच्या पाठपुराव्याने दौंड तालुक्यातील कानगाव परिसरातील अवैद्य दारू धंदा उध्वस्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..

 


पुणे-दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)
       पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव तसेच भानोबा विद्यालय व परिसरातील  अवैद्य दारूधंदे याविषयी सातत्याने महिलावर्ग व जनसामान्य जनतेच्या असंख्य तक्रारी महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती अध्यक्ष मंगेशजी फडके दौंड तालुका दारूबंदी कृती समिती अध्यक्ष विनायक  दोरगे यांच्याकडे येत होत्या..
तसेच त्रिदल सैनिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष मेजर संदिप लगड यांच्या मार्गदर्शनाखाली देखील संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये हि अवैद्य धंदे व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी  मोठे जनांदोलन उभे केले आहे .


       
      त्यानुसार महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला असता राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब ढवळे व पोलीस उपनिरीक्षक श्री घाणेकर यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे  परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त  केले आहे अवैद्य दारू धंद्यामुळे अनेक संसार व तरुण देशोधडीला लागले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील काही छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये  हि विना परवाना सरास दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीकडे येत आहेत स्थानिक प्रशासनाने सुद्धा अवैध धंद्यान विषयी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे . असे परिसरातील नागरिक बोलताना दिसत होते. सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गाला काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती त्रिदल सैनिक सेवा संघ. माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार. यांच्याशी संपर्क साधावा..
 थोड्या दिवसात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्याशी देखील महाराष्ट्र दारूबंदी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष मंगेश फडके, त्रिदल सैनिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष मेजर संदिप लगड, पुणे जिल्हा माहिती सेवा भावी संस्था माहिती अधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष  विनायक दोरगे व पदाधिकारी  चर्चा करणार असल्याचे त्यानी सांगितले .


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image