आजच्या दिवस भरातील मुंबईतील घडामोडीचा वेध

डी कल्चर पासून युवा पिढीने दूर राहावे - सुप्रसिद्ध माॅडेल  अभिनेत्री निशा यादव



( मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)


डी कल्चर वर भाष्य करणाऱ्या रोज सकाळी संध्याकाळी असंख्य बातम्यांच्या प्रसारणामुळे सर्व सामान्य जनतेच्या घरा घरात या विषयावर चर्चा रंगत आहेत.डी कल्चर म्हणजे काय ?( डी कल्चर  -दारू ड्रग संस्कृती ) गेल्या काही दिवसांपासून  बॉलीवुड़ मध्ये जे वादळ निर्माण झाले आहे , आणि मीडिया प्रसार माध्यमे ज्या पद्धतीने एक एक किस्से प्रकाश झोतात आणत आहे. त्यात बॉलीवुड मधील काही मोठे लोकही सामील आहेत. त्या ड्रग कल्चर वर मुंबईतील सुप्रसिध्द मॉडेल अभिनेत्री निशा यादव हिने भाष्य केले. त्यात निशा ने सांगितले की प्रथम मी टू सुरू झाले.जे राज कपूर ने प्रचलित केले होते. काही अभिनेत्रींचे जातीय शोषण , नंतर तो एक ट्रेंड बनत गेला आणि त्याचे परिणाम मी टू आले.आता ड्रगचे सेवन करणारा सर्वात प्रथम बॉलीवुड मधील कोणी व्यक्ति असेल तर तो संजू बाबा होता. तेव्हा इतकी प्रसार माध्यमे मीडिया नव्हती आणि सोशल नेटवर्किंगची साइट्स नव्हती, आणि किस्से फक्त मुख्य टैब्लॉयड पर्यंतच प्रिंट होत होते व्यक्तीगत मुलाखतीच्या माध्यमातून , आता जेव्हा नवीन लोक  बॉलीवुड मध्ये येत असतात तेव्हा ताण , तणाव ,स्ट्रेस , डिप्रेशनची शिकार झाल्यामुळे ड्रग्स कडे त्यांचा जास्त ओढा वाढत जातो.तणावा पासून थोडी सुटका करून घेण्यासाठी त्यांना पार्टी मध्ये आरोग्यस हानिकारक अशी अंमली द्रव्य दिली जातात,आणि नंतर त्यांना या व्यसनांच्या नादी लावून व्यसनाधीन केले जाते. ज्यामुळे तो अंमली पदार्थांच्या सेवनाने व्यसनाधीन झालेला तरुण आतून पुर्णपणे पोखरला जातो. या अंमली पदार्थांच्या सेवना नंतर एक क्षणिक  आत्मविश्वास निर्माण होतो, आणि त्यामुळे आणखी आनंद मिळतो. परंतु नंतर याचे वाईट दुष्परिणामही त्यांना भोगावे लागतात.विशेषत: अभिनेत्री निशाने तरुण पिढीला मीडिया , प्रसार माध्यमांनी प्रसारीत केलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनाने ड्रग्ज व्यसनाधीन असणाऱ्या या सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बातम्या सतत पाहून अंमली पदार्थांच्या ड्रग्जच्या आहारी न जाता अंमली पदार्थ , ड्रग पासून दूर राहावे असे आवाहन केले आहे. नाही तर तरूणांना याचे वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील. तसेच एकदा का तरुण युवा पिढी ड्रगच्या विळख्यात सापडली की त्यांच्या पुढील भविष्यात अंधार , दुःख आणि ग्लानी शिवाय काहीच नाही.भारतीय संस्कृती मध्ये कधीही कुठेही या भयंकर वस्तुंचा संदर्भ नाही. सोमरसाचा उल्लेख आढळतो  वेदांमध्ये पण तो सोमरस म्हणजे दारू नाही तर सोमरस हे एक औषधीय अमृत पेय आहे, ज्याला पश्चिमात्य जगतात  दारू च्या नावा बरोबर जोडून  युवा पिढीला डी कल्चर मध्ये ( दारू ड्रग ) घेण्यासाठी प्रेरित केले जाते. तरूण युवा पिढीने डोक्याचा वापर करून विचार करावा आणि डी कल्चर पासून सदैव दूर राहावे. तसेच आपली आदर्श भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी डी कल्चरच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत ते तरुण युवा पिढीने हाणून पाडले पाहिजेत ‌.आपले अतिशय महत्त्वाचे जीवन उगाच  केल्शदायक  करून उध्वस्त करू नका , आपल्या कुटुंबियांवरं प्रेम करा. आपला भविष्यकाळ उज्ज्वल करा आणि बहुमोल जीवन प्रवासात यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन अभिनेत्री निशा यादव हिने  तरूण युवा पिढीला केले आहे.


                                ★★★
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सहसंयोजक पदी संतोष आव्हाड यांची निवड



(मुंबई प्रतिनिधी /लक्ष्मण राजे)


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत (दादा) पाटील , भ.वि.आ.चे प्रभारी मा.श्रीकांत भारतीय यांच्या सुचनेनुसार आघाडीचे प्रदेश संयोजक मा.आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात भाजपा भटके-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात वंजारी समाजाचे युवा नेते संतोष आव्हाड यांची चौथ्यांदा प्रदेश सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली. विशेषतः सर्व समाज समावेशक संघटनात्मक बांधणी करून भटके-विमुक्त समाजातील समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी आव्हाड गेली वीस वर्षे सदैव काम करीत आहे‌त.माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भटके विमुक्तांसाठी असलेले महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विकास महामंडळावर ते संचालकही होते. तसेच सर्व जाती आणि जमातीतील समाज बांधवांना एकत्र सोबत घेऊन शहरांच्या बरोबरीनेच गावोगावी भटके विमुक्तांचे संघटन मजबूत  करण्यासाठी मोठे नेते म्हणून ते ओळखले जातात. तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्वाने दिलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी भटके-विमुक्त समाजाच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवून समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करून केलेल्या नेतृत्वाची निवड सार्थ ठरवू असं मनोगत संतोष आव्हाड यांनी व्यक्त केले.


                   ★★★
 घाटकोपर पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालचे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन


घाटकोपर (केतन भोज)


  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


           


         या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ,महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र पवार,ईशान्य मुंबई निरीक्षक विलास माने,अल्पसंख्यांक विभाग मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार,विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले,मनोज व्यवहारे, विक्रोळी तालुका अध्यक्ष अब्दुल अन्सारी,मुलुंड तालुका अध्यक्ष अमित पाटील, घाटकोपर पूर्व अध्यक्ष बापू धुमाळे, युवक जिल्हाध्यक्ष भूषण शेलार घाटकोपर पश्चिम तालुक्यातील सर्व वार्ड अध्यक्ष  सर्व फ्रंटलचे अध्यक्ष,सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव आणि प्रभाग क्रमांक १२३ चे अध्यक्ष शंकर महाडिक यांनी केले होते.


                ★★★


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image