कुख्यात ज्वालासिंग टोळीतील  २९ वर्षापासून फरारी असलेले दोघे आरोपी यवत -उरूळी कांचन भागातुन ताब्यात : पुणे ग्रामीण LCB पथकाची दमदार कामगिरी

 


पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)

      पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख. पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना आज  दिनांक ०२/१०/२०२० रोजी पुणे ग्रामीण LCB टिमला मिळालेल्या बातमीवरून *मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर गु.र.नं. १७/१९९१ व १९/१९९१ भा. द.वि. कलम ३९५,३९७* या दोन दरोडयाच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील असलेले २९ वर्षापासून फरारी आरोपी 
१)काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत 
वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे 
२) अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत वय ५८ रा.दत्तवाडी. उरूळी कांचन ता. हवेली जि.पुणे यांना उरुळीकांचन येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही ह्या भागात अनेक वर्ष नाव बदलून राहत होते. तसेच  आतंरराज्यीय कुख्यात गुन्हेगार  ज्वालासिंग टोळीचे दोघे आरोपी सदस्य असल्याचे समजत आहे. सदर आरोपींची वैद्यकिय तपासणी करुन  मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात येत आहे.


         
     सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली  पो.हवा. महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर  निचित, प्रमोद नवले यांनी केलेली आहे. 
ह्याआधी ही पुणे ग्रामीण LCB पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली  अभिमानास्पद कामगिरी करत मोठ मोठे गुन्हे व गुन्हेगार यांचा छडा लावला आहे .


 


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image