दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा एकदा अग्नितांडव कोणतीही जीवित हानी नाही.

 


पुणे -दॊंड/लोकनिर्माण (विनायक दोरगे)
      दौंड :कुरकुंभ (ता. दौंड .जि.पुणे ) MIDC औद्योगिक वसाहती मध्ये शिवशक्ती ऑक्सलेट प्रा.लि. कंपनी मध्ये गुरूवारी दि.1 ऑक्टोबर रो. मध्यरात्री सुमारे पावणे दोनच्या सुमारास भिषण  आग लागली व मोठमोठाले स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. यामध्ये कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
    आग विझवण्यासाठी दौंड नगरपालिका अग्निशामक दलाच्या गाड्या . कुरकुंभ अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बारामती एमआयडीसी अग्निशामक  दलालाची एक गाडी आशा एकुण पाच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत.
 आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तास शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली .. समोर आलेल्या माहितीप्रमाणे शॉर्टसर्किट होऊन  सॉल्व्हंटच्या केमिकल मिश्रणाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 


           


   कुरकुंभ एमआयडीसी मध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटना आगीचे तांडव हानीकारक केमिकल युक्त पाणी असे अनेक प्रश्न यामुळे कामगार व येथील रहिवासी शेतकरी यांचे प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय होत असतो यावर प्रशासनाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे व येथील नागरिक नेहमीच जीव मुठीत धरून जगत आहे अशी चर्चा नागरीक करताना दिसुन येत होते. कुरकुंभ च्या पोलीस पाटील रेश्मा शितोळे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणे द्वारे संदेश देत नागरिकांनी   घाबरून  जाऊ नये असे आव्हान केले.
      दौंड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुनिल महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 12 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे व सदर दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली  नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याचे  व कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आजूबाजूच्या परिसराला कुठलाही धोका नसल्याचे सांगितले.


पत्रकार - श्री विनायक दोरगे ..


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image