हाथरस (उत्तरप्रदेश)  मागासवर्गीय  भगिनी वर क्रूर अमानुष बलात्कार हत्या प्रकरणी दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनला झोपडपट्टी सुरक्षा दल व विविध सामाजिक संघटनांकडून संयुक्त निवेदन देत जाहीर   निषेध नोंदविण्यात आला

 


पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे) 


   दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे  हाथरस उत्तर प्रदेश येथील मागासवर्गीय भगिनीवर अमानुष बलात्कार हत्या प्रकरणी निषेध नोंदवत विविध सामाजिक संघटना यांच्यावतीने संयुक्त निवेदन पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये हाथरस अमानवी  क्रूर  मानवतेला काळीमा फासुन अमानुष बलात्कार हत्या प्रकरणाचा जाहीर निषेध करत आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा उत्तर प्रदेश सरकारविरोधी तीव्र प्रकारचे आंदोलन विविध संघटनांमार्फत करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


   
       यावेळी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दल संघटक श्री दत्तात्रय डाडर. माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष श्री विनायक दोरगे. मातंग नवनिर्माणसेना तालुका अध्यक्ष काळूराम शेंडगे, आरपीआय दौंड तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड. पशुवैद्यकीय सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष डाॅ. संतोष बडेकर.
माहिती सेवा भावी संस्था पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री विजय कदम. दौंड तालुका आर  पी आय मातंग आघाडी अध्यक्ष श्री संजय अडागळे. वंचित आघाडी दौंड तालुका उपाध्यक्ष श्री बापु जगताप. समता परिषद दौंड तालुका कार्याध्यक्ष श्री मंगेश रायकर, माहिती सेवा भावी संस्था दौंड तालुका युवक उपाध्यक्ष कु.सुधीर दोरगे, सामाजिक कार्यकर्ते श्री विलास भालेराव दिलिप चांदणे सचिन बगाडे यावेळी उपस्थित होते .


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image