लॉकडाऊन काळात भाजपाने केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन


 
पुणे - वडगाव मावळ/लोकनिर्माण (विनाायक दोरगे) 


      मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने मार्च ते जून २०२० या कालावधीत लॉकडाऊन दरम्यान तालुक्यातील नागरिकांसाठी केलेल्या सेवाकार्याची माहिती देणाऱ्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन आज मा. राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजपचे ज़िल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे,देहू शहराध्यक्ष मच्छिन्द्र परंडवाल यांच्या हस्ते करण्यात आले.वडगाव येथील पक्षाच्या मुख्यालयात मावळ तालुका भाजपाची मासिक बैठक आयोजित करण्या आली होती.यावेळी मावळ तालुका भाजपा किसान मोर्चा,कामगार आघाडी,ओबीसी आघाडी,धनगर समाज परिषद,मातंग समाज परिषद आदी आघाडींची कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच मावळ तालुका भाजपच्या चिटणीसपदी जांभूळ येथील राजू गाडे यांची आणि तालुका उपाध्यक्षपदी सावंतवाडी येथील प्रकाश सखाराम होजगे यांची निवड करण्यात आली.देहू शहर भाजपा कार्याध्यक्षपदी रायबा मोरे व युवा मोर्चा अध्यक्षपदी अनिरुद्ध काळोखे यांची निवड करण्यात आली.पिंपरी -चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पदी सोनमताई विनायक मोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


           


     यावेळी झालेल्या मासिक बैठकीस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांसह मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे, जि.प.सदस्य नितीन मराठे,सभापती निकिताताई  घोटकुले,उपसभापती दत्तात्रय शेवाळे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम कदम,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिन्द्र केदारी,,सुमित्राताई जाधव,अनंता कुडे अभिमन्यू शिंदे,नामदेव वारिंगे,विकास लिंभोरे,सचिन भांडे,सागर शिंदे,राहुल कराळे,अर्जुन पठारे,अमोल भेगडे,देविदास गायकवाड,दत्तात्रय गाडे,गणेश गायकवाड,राजू शिंदे,विकास शेलार,धनश्रीताई भोंडवे,गणेश कल्हाटकर,विकी म्हाळसकर,आश्विनीताई साठे,सीमाताई आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image