मनिषा वाल्मिकी  यांना कल्याण पूर्व मधून भावपूर्व श्रद्धांजली आणि जाहीर  निषेध!

 



कल्याण/लोकनिर्माण न्यूज (सौ राजश्री फुलपगार) 


कल्याण पूर्व  मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था तसेच पक्ष संघटना यांच्या  सहयोगाने कल्याण पूर्व येथे


रविवार दि. ४ ऑक्टोंबर २०२० रोजी  संध्याकाळी ६:०० वा. वाजता ड प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून कोळसेवाडी पोलीस स्टेशन पर्यंत  आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात सर्वांनी पक्ष, जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता, कोरोना 
 साथीच्या  सर्व अटी व शर्ती पाळून त्या पिडीतेला न्याय मिळून देण्यासाठी  तसेच  नेहमीच  होणाऱ्या अंन्यायला वाचा फोडण्याचे काम तसेच लोकांमध्ये  जन जागृती  करण्याचे काम या संस्था करीत असतात. 


     मध्यंतरी होऊन गेलेले  प्रियांका रेड्डीचे सुध्दा प्रकरणामध्ये  कल्याण पूर्व, मध्य कल्याण विकासनी उधाय रसाळ, आणि स्री मुक्ती सामाजिक  शिक्षण संस्था सौ. वर्षा काळके  यांच्या वतीने केंडल मार्च घेण्यात आला होता. आज पुन्हा एकदा  कल्याण पूर्व मधील एक जुट पाहण्यास मिळाली आहे. कुठल्याही पक्ष ,आणि राजकारण न करता सर्व संस्था एकत्रित येऊन त्यांनी  मनीषा वाल्मिकी यांना भावपूर्वक  श्रद्धांजली वाहिली गेली. यावेळी प्रत्येक महिला  अतिशय आक्रोश करून सांगत होत्या की, आपल्या देशाची व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित नाही. बलात्काराचे प्रकरण नेहमीच घडत असतात. मुलांना आपल्या घरातून संस्कार शिकवला जाणे गरजेेेचे आहे.
या  क्रूर पणाचे धाडस हे घरात योग्य संस्कार  न मिळाल्यामूळे घडत आहे. अस महिला वर्गाचं म्हण आहे. उपजत वयापासून  मुलाना  योग्य संस्कार करायला हवेत तसेच  मुला - मुलींना समान वागणूक मिळायला हवी. आज 
उत्तर प्रदेश हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून,  क्रूरपणे मारून मरणासन्न सोडलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला. तिने मृत्यू पूर्वी दिलेल्या जबानीत बलात्कार झाल्याचे सांगितले होते. या मुलीचा देह पोलिसांनी घाईघाईने मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळला. पोलिस अधिकारी  न्याया ऐवजी पीडितेच्या कुटुंबावर एक प्रकारे दबाव टाकत आहेत. 


     


       या घटनेने पिडीत व सरकारी दहशती खाली असलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन तसेच नराधमाना लवकरात लवकर फाशिकी शिक्षा जाहीर करावी असे तसेच मनिषाला न्याय मिळावा आणि आपल्या देशात अश्या घडणाऱ्या  गुन्हेगारांना नेहमी सरकार  पाठबळ देत असते म्हणून असे गुन्हे वारंवार घडत असतात. अश्या नराधमाना इतर देशात ज्या शिक्षा दिल्या जाताततशीच शिक्षा आपल्या देशात व्हावी अशी महिला आणि विविध संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे .  
*कल्याण विकासिनी,
*टायगर ग्रुप कल्याण,
*सर्वात्मका सामाजिक संस्था ,
*स्त्रीमुक्ती सामाजिक संघटना,
*सक्षम बहुजन उद्योग समूह
*आई सामाजिक संस्था,
*कल्याण पुर्व मेडिकल, प्रॅक्टीशनर्स सोशल वेल्फेअर असोशिएशन,
*मी कल्याणकर सामाजिक संस्था,
*मराठा समाज विकास मंडळ,कल्याण(रजि),
*वाघेश्वरी प्रतिष्टान,महाराष्ट्र
*सम्यक संबोधी सामाजिक सेवाभावी सस्था,
*संकल्प सामाजिक संस्था,
*अभ्युदय युवा फाउंडेशन,
*सप्रेम सामाजिक संस्था,
*समाज प्रबोधन सामाजिक, संस्था
*भारतीय बौद्ध, महासभा,चिंचपाडा शाखा,
     तसेच प्रमुख महिला वर्ग,सौ वर्षा कळके, सौ राजश्री फुलपगार, सौ.सुरेखा गावंडे, सौ.सारिका गायकवाड, कुसुम  घेडम, दिपाली गायकवाड ,नीलम व्यवहारे, प्रेम न्यायनिथ, पूजा पगारे, ज्योती अय्यर,भावना मनवर, विद्या मोरे, पद्मिनी कदम, सौ.उर्मिला पवार, सौ. पल्लवी जाधव, 
 सौ.वंदना लोखंडे, सौ.निशा जगधने ,  खरात,
शीला शिंदे, तूषा शिंदे, सौ.अनिता सोनवणे, तसेच पुरुष वर्ग मान्यवर उधाय रसाळ, मनोज नायर, विजय मोरे,  बेळामकर सर ,राजू अंकुश, राजू रोकडे, सुशांत जाधव, राजेश मनिवडे, प्रमोद दिवेकर, प्रशांत मोरे, विष्णु गायकवाड, राजाराम पावशे, शरद पाटील, संजय निर्भवणेआणि  इतर मान्यवर उपस्थित होते .


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image