आपण असाल सुशिक्षित, तर कोरोनापासून रहाल सुरक्षित! - ( संपादकीय )

                ✒️ संपादकीय 


 


        कोरोनाची साथ सुरु झालेला आता सहा महिने पार पाडत असताना आणि लॉकडाऊन असतानाहिउ रुग्ण संख्येच्या वाढीवर परिणाम झाला होता. देशातील अनेक उद्योगधंदे बंद झाले असून बेकारीची लाट मोठ्याप्रमाणात आली होती. सरकारकडे असलेला खजिना रिकामा होत आला आहे. तरी कोरोना काही पाठ फिरवत नाही. म्हणून सर्वसामान्य विवंचनेत आहेत. तर शासनाची उद्योग व व्यवसाय चालू करुन काही प्रमाणात रोजगार चालू करुन रिकामी असलेली तिजोरी भरता येईल यासाठी लॉकडाऊन उठविण्यासाठी काही टप्पे ठेवण्यात आके आहेत. त्यामुळे काही प्रमाणात उद्योगधंदे चालूही झाले आहेत. मात्र देशातील ६० टक्के रोजगार पूणपणे बंद झाले असल्यामुळे बेकारांची समस्या वाढत चालली आहे. तर लॉकडाऊन काही प्रमाणात  शिथील करण्यात येत आल्यामुळे पुन्हा कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे  जे घरी आहेत ते कोरोना जाण्याची वाटप आहेत, मात्र  ते सुरक्षित आहेत. परंतु घरातील दाणागोटा   संपल्यानंतर करणार काय असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे. रुग्णांचा आलेख  वाढण्यास बर्‍याच अंशी खाजगी रुग्णालये जबाबदार आहेत. अवास्तव भरमसाठ बिले लावल्यामुळे खाजगी रुग्णालयाकडे जाण्यासाठी रुग्णांनी पाठ फिरवली आहे. आजारासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा घरी राहून जीव जाईल तेव्हा जाईल, पण हाॅस्पीटल नको अशा परिस्थितीत रुग्ण आहेत. तर सरकारने अशा रुग्णालयांवर कायदेशीर बडगा न उगारल्यामुळे रुग्णालयाचे डॉक्टर माजले आहेत. अशा रुग्णालयांवर आणि त्यांचे संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. परंतू सरकारचे हितसंबध त्यामध्ये दडले असल्यामुळे खाजगी रुग्णालयांचे फावले आहे!
      कोरोनावर अजून लस उपलब्ध झालेली नाही पोटाची खळगी भरण्यासाठी अणि कुटूंब पालन       करण्यासाठी सरकारने उद्योग धंदे मोठ्याप्रमाणात चालू केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारकडे पैसा नसल्यामुळे  सरकार गप्प आहे. यासाठी धनदांडगे रुग्णालयांनी कमाविलेल्या पैशावर कायदेशीर  मार्गाने जप्ती आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अशा खाजगी रुग्णालयालाचे संचालक यांनी करोडो रुपयांची माया जमवली आहे. कोरोनावर लस येऊ नये किंवा कोरोना जाऊ नये यासाठी  असे हे राक्षसी क्रुत्य करणारे नराधम  देवाजवळ प्रार्थना करत आहेत. त्यांच्या अंगात कोरोना राक्षस दडलेला आहे.  आता पूढे हा कोरोना संपत आला तरी, कोरानाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे! त्यावेळेस काय करणार? शिक्षण आणि उद्योग या व्यवसायाला  प्रथम प्राधान्य देवून बेरोजगाराचा प्रश्‍न मिटवला पहिजे. त्यासाठी कोरोनावर विशेष जनजागृतीचे कार्यक्रम आखते गेले पाहिजेत. आज जे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ते घरी असणारे बहुतेक कुटुंबातील  रुग्ण आहेत. कारण पोटासाठी बाहेर पडण्यास गत्यंतर नसल्याने आपण बाहेरूनच कोरोनाला घरी घेऊन येतो. साहजिकच कुटूंब या साथीला बळी पडत आहेत. मात्र पोटासाठी  नागरीक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढणार हे निश्‍चित! यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करणे, बांधीतांवर वेळीच उपचार करणे, बाधीतांवर उपचार करण्याबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तीची तपासणी शासनाला मोफत करावी लागणार आहे. त्यासाठीच  शासनाने 'माझे कुटूंब माझी जबाबदारी'  हे सुरु केले आहे. यामुळे घरोघरी डाॅक्टर,आरोग्य सेवक, आशासेविका नैराश्य जाऊन तपासणी करत आहेत. जेणेकरून कोरोनातून काही अंशी मुक्तता मिळेल.
     मात्र कोरोना हा आपल्याला शोधत आहे. तो म्हणजे गर्दीचे ठिकाण, हातावाटे  तोंडाव्दारे जाण्याचा प्रयत्न कोरोना करणार आहे.  त्यासाठी सर्वप्रथम बाहेर नोकरी वा उद्योगासाठी जाण्यार्‍यांनी आपले कुटूंब वाचवण्यासाठी तासा तासाने  सॅनिटायझर आणि मास्क लावून किंमान १ मीटर अंतराच्या आत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण कोरोनावर जरी लस आली  तरी कदाचित दुसरा करोना  आल्यावर त्या लसीचा कदाचित    उपयोग होणार नाही. म्हणून कामानिमित्त आणि कामाशिवाय बाहेर पडणारा हा मानवी बाँब   असतो. तो घरी आल्यावर त्याचा स्फोट होऊ शकतो. म्हणजेच घरचे कुटूंब संसर्गमय होत असतात. त्यासाठी स्वत: आपण आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतल्यास आपले कुटुंब सुरक्षित राहून कोरोना जवळपास फिरकणार नाही हे निश्‍चित!


            ✒️ संपादक - बाळकृष्ण कासार 


                           *******-------******