सामाजिक कार्यकर्त्या माधुरी महेंद्र पाटील यांचे आकस्मिक निधन 

               


मुंबई/लोकनिर्माण (उमेश घोले)


       सामाजिक कार्यकर्त्या माधुरी महेंद्र पाटील पूर्वाश्रमीच्या ज्योत्स्ना रघुनाथ वतनदार यांचे दि. ३ ऑक्टोबर रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. भांडुपगावातील प्रतिष्टीत कै . रघुनाथ वतनदार यांच्या कन्या त्यांनी आपलं महाविद्यालयीन पूर्ण करून प्रथमश्रेणी पदवी संपादन केली होती. घरच्या व्यापामुळे नोकरी केली नाही. पण मातोश्री कै . लिलाबाईंना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देत कार्यरत राहिल्या. त्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिंचखरी गावच्या रहिवाशी होत्या. सर्व सणासुदीना गावातील लोकांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या गावात आणि भांडुप गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती महेंद्र, मुलगा, मुलगी, भाऊ प्रशांत, वीरेंद्र, जयेंद्र, भावजया असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव परोपकारी होता. त्यांच्यावर विक्रोळी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image