महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार काँग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी संजय शिंदे यांची नियुक्ती



  लातूर /लोकनिर्माण  प्रतिनिधी


         
          सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार काँग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
सदरील नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशअध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंञी तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे वैधकिय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमितभैय्या देशमुख, आ.धीरजभैय्या देशमुख, लातूर जिल्हा कांग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेसचे प्रदेशअध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांनी केली आहे. संजय शिंदे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. संजय शिंदे हे गत वीस वर्षांपासून असंगठित कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्यांची व एकनिष्ठेची दखल घेऊन माजीमंत्री तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, वैधकिय शिक्षणमंत्री तथा पालकमंञी अमितभैय्या देशमुख, आ.धीरजभैय्या देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.चे व्हाईस चेअरमन श्रीशैलदादा उटगे यांनी केली आहे. या निवडीबद्दल संजय शिंदे म्हणाले की, भारतीय कांग्रेस पक्षाने व आमचे मार्गदर्शक तथा माजीमंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख, आ.धीरजभैय्या विलासराव देशमुख, भारतीय कांग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाअध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून माझी महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेस लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी निवड केली. या निवडीने असंगठित कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व कांग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी एकनिष्ठेतेने कार्य करित कांग्रेस पक्ष संघटन बळकट करण्याकरिता कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.