दिवाळीतील किल्ले तयार करण्याची अखंडित पन्नास वर्षाची परंपरा जपत यवत येथे  खुटवड परिवारातील तिसऱ्या पिढीने साकारला भव्यदिव्य किल्ले नळदुर्ग

 


पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे) 


           


   पुणे जि. दौंड तालुक्यातील यवत येथील  खुटवड परिवारातील तिसऱ्या पिढीतील बच्चेकंपनीने पन्नास वर्षाची परंपरा अखंडितपणे पुढे सुरू ठेवत. नाना आजोबा कुंडलिक खुटवड यांच्या कल्पनेतून ३५० स्क्वेअर फुट जागेत भव्यदिव्य नळदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारल्याचे नात सृष्टी खुटवड हि किल्ल्याची माहिती देताना सांगत होती टाकाऊ पासून टिकाऊ ह्या तत्वावर ह्या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे. पुठ्ठयापासुन किल्ल्याचे  बुरुंज तटबंदी दरवाजे अतिशय रेखीव पद्धतीने तयार करण्यात आले आहेत रंगसंगती याचा योग्य वापर त्याचप्रमाणे मावळे व इतर सैन्या व किल्ल्यावर असणारी वर्दळ याचे अचूक अशी मांडणी करण्यात आलेली आहे व सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रेखीव भव्य पुतळा ह्या किल्ल्याच्या वैभवात भर घालताना दिसत आहे .. सौरभ श्रेयस सृष्टी शुभम वैभव प्रतीक ह्या भावंडांनी गेले सात दिवसापासून अखंड परिश्रम करून घरातील थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन मदतीने हा सुंदर किल्ला उभारला असून यवत व पंचक्रोशीतील नागरिक पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.मा.पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड व त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या मार्गदर्शन व  प्रोत्साहनामुळे  ह्या मुलांनी दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे व आपल्या परंपरा ह्या अशाच पद्धतीने जपल्या गेल्या पाहिजेत तेव्हाच आपल्या येणाऱ्या पिढ्याना इतिहासाची माहिती व योग्य दिशेने वाटचाल करता येईल यात तिळमात्र शंका नाही.