उत्तर प्रदेश हाथरस  प्रकरणात न्याय व्हावा याकरीता सुरू झालेल्या जिजाऊ सावित्री बाग ,चे सातव्या दिवसाच्या आंदोलनात तोच जोश

 


कल्याण/लोकनिर्माण न्यूज (सौ.राजश्री फुलपगार)


     हाथरसची कन्या  व भारतातील तमाम बलात्कार हत्या, अत्याचारास बळी पडलेल्या  मुलीच्या महिलांच्या, न्याय, सन्मान, समानता, आणि श्रध्दांजली करीता एकत्रित येणं गरजेचे आहे.आपण सातत्याने पाहतोय , सामूहिक बलात्कार, हत्या सत्र सुरू आहेत. मुली , महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेत. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत .मुली आणि महिलांची सुरक्षितता कशी होईल ? न्याय कसा मिळेल ? अशा घटना कशा थांबतील ? यासर्व प्रश्नांवर बोलले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे हा आवाज सर्व दूर शासन, प्रशासन यांच्या कानापर्यंत  गेला पाहिजे. या करीता सुरू झालेले आंदोलनाचा आजचा सातवा दिवस होता. 
सहावा दिवसाची सर्वात संविधानाची प्रस्तावना एकत्रित वाचन करून झाली.


         


      प्रमुख वक्त्या माजी सभापती मायाताई कटारिया यांनी परखडपणे आपले मत मांडताना, उत्तर प्रदेश सरकारने ताशेरे ओढले. जाहीर निषेध झाला पाहिजे असे मत मांडले तसेच महिलांनी एकत्रित येत आपले आंदोलन पुढे नेले पाहिजे .सक्षम झाले पाहिजे. हे आंदोलन दिसते तितके छोटे नाही खूप मोठे आहे. याबद्दल आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले.
आजच्या आंदोलनात सौ.वर्षा ताई कळके, सौ राजश्री. फुलपगार, मीनाक्षी आहेर, शिल्पा आंबादे, दिनेश कुंदे, भारती जाधव, कुसुम शिंदे, तसेच इतर महिला उपस्थित होत्या.


      जिजाऊ सावित्री बागेच्या समन्वयक यांनी उपस्थितांचे आभार मानले सलग चालणाऱ्या या आंदोलनास संस्था संघटनांनी पाठीब्याचे पत्र देण्याचे आवाहन तसेच कल्याण तसेच इतर शहरातील महिला अत्याचार व मदती करीता काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना एकत्रित जोडून काम करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.


        या आंदोलनाच्या महिला सूत्रसंचालक सौ वर्षाताई कळके यांनी सौ माया कटारिया ताईना उत्कृष्ट महिलांच्या बाबतीत चांगले वक्तव्य केले म्हणून सर्व महिलांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले . आणि पुढील आंदोलन अश्याच प्रकारे  कल्याण पूर्व मध्ये होतील असे सौ.वर्षाताई कळके म्हणाल्या.