पत्रकारांना धमकी देणारा मुजोर कर्मचारी छोटेलाल पांडेची चौकशी सुरू कारवाईची मागणी .. पत्रकारांवर होणारे अपमानास्पद प्रसंग हल्ले लोकशाहीला मारक अभिव्यक्ती स्वतंत्र धोक्यात.

पुणे /लोकनिर्माण (विनायक दोरगे)


      वरिष्ठ पत्रकार सेंट्रल प्रेस जर्नालिस्ट  असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व  पत्रकार अरविंद बनसोडे यांना धमकावणा-या मुजोर रेल्वे कर्मचारी छोटेलाल पांडे याच्या चौकशीला अंधेरी रेल्वे पोलिसांकडून  सुरुवात.
सदर घटना ही सोमवारी वरिष्ठ पत्रकार कसालकर व बनसोडे हे महत्वाच्या  वार्तांकनासाठी जात असता अंधेरी पूर्व येथील तिकीट काऊंटरवर चर्चगेट साठी तिकीट घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी कार्यरत असणारा छोटेलाल पांडे यांनी तिकीट देण्यास नकार देत  अर्वाच्च भाषेत धमकी देत अपमानित केले हि बातमी सेंट्रल प्रेस जर्नालिस्ट असोशियन च्या पदाधिकारी सदस्य यांना कळताच संपुर्ण राज्यातील पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.
झालेल्या प्रकाराची तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांनी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्याकडे केली असता त्यांनी लगेच अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना योग्य ते कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन कांबळे यांनी  संदीप कसालकर यांच्याशी या विषयावर चर्चा करून रेल्वे तिकीट कर्मचारी छोटेलाल पांडे याच्यावर योग्य ती कारवाई साठी माहिती घेतली व संपूर्ण तपास करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले त्यावेळी पोलीस निरीक्षक निकम व कांबळे यांना  निवेदन देण्यात आले.
     तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले पत्रकारांवर सूडबुद्धीने दाखल होणारे गुन्हे हे लोकशाहीला मारक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर  हल्ला आहे
त्यामुळे पत्रकारिता क्षेत्र एक दिवस मोडकळीस निघेल व नवीन तरुण या क्षेत्रामध्ये येण्यास धजावणार नाहीत त्यामुळे सरकारने ह्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे मत
 रेवन्नाथ नजन - प्रदेश उपाध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघ. यांनी व्यकत केले ..