'दर्याचा राजा'च्या दीपावली अंकाचे प्रा. माधवी कुंटे यांच्या हस्ते प्रकाशन 

 


मुंबई/लोकनिर्माण (पंकजकुमार पाटील)


     दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे संपादित 'दर्याचा राजा' या तेराव्या अंकाचे प्रकाशन करताना अतिशय आनंद होतोय. यानिमित्ताने प्रकाशक तामोरे यांचे अभिनंदन करते आणि त्यांना साहित्याचार्य पदवी उगीच लाभली नाही. त्यांनी इतके सातत्याने काम केले आहे आणि अद्यापहि कार्यरत आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक थोर लोकांचे आशीर्वाद 'दर्याचा राजा' अंकास लाभले आहेत. त्यांच्याच एक भाग म्हणून प्रतिवर्षी अंक काढत राहा असे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. माधवी कुंटे यांनी प्रकाशन करताना प्रतिपादन केले. 


     
     प्रारंभी 'दर्याचा राजा'चे संपादक पंढरीनाथ तामोरे यांनी सांगितले पहिल्या  अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक सुधाकर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर महनीय प्रभृतींच्या हस्ते प्रकाशन झाली.  आज तेराव्या अंकाचे प्रकाशन प्रा. माधवी कुंटे यांच्या हस्ते होत असताना त्यांनी २२ वर्षे प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा केली. त्यासोबत साहित्यसेवा त्यांचा साहित्य प्रवास पाहता आम्हाला नेहमीच प्रेरणा लाभली असल्याचे नमूद केले. 
याप्रसंगी सहसंपादक प्रमोद कांदळगावकर, राजेंद्र मेहेरे, आशिष नाईक, अविनाश तांडेल, धनंजय नाईक, भानुदास तारे, रोहिदास तारे, जयवंत गावडे आदी मान्यवर प्रभृती उपस्थित होत्या. 
      दर्याचा राजाचे सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी कोरोना महामारीची स्थिती असताना यावर्षी अंक निघणार का?  अशी स्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढत संपादक तामोरे सर्वजण यशस्वी होऊ शकल्याचे आभार प्रदर्शन करताना नमूद केले.


Popular posts
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image