पार्टटाईम जॉबचे आमीष दाखवूनचिपळुणात तरुणाची १३ लाखाची फसवणूक

 

चिपळूण/ लोकनिर्माण ( जमालुद्दीन बंदरकर)

 पार्टटाईम जॉब करून पैसेकमावता येतील असे आमीष दाखवून येथील तरुणाची १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च महिन्यात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅरी वॉशिंग्टन व अंकूर (पूर्ण नावे, गावे माहिती नाहीत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद निखिल रमाकांत शिंदे (३०, ) यांनी दिली आहे. पोलिसांनी माहितीनुसार निखिल शिंदे ५ मार्च रोजी सकाळी  गॅरी वॉशिंग्टन व अंकुर या अज्ञातांनी पार्टटाईम जॉब करून पैसे कमावता येतील असे आमीष दाखवत शिंदे याच्याकडून एकूण १३ लाख १५ हजार ५३४ रुपये गॅरी वॉशिंग्टन व अंकुर यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर व युपीआडीवर निखिल याने त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेतले. गॅरी वॉशिंग्टन व अंकुर यांनी निखिल याला त्याचे पैसे परत न देता फसवणूक केली. हा प्रकार निखिल याच्या लक्षात आल्यानंतर त्याने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली.


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image