फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फौंडेशनकडून महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप

 

रत्नागिरी लोकनिर्माण (सुनील जठार)

 सामाजिक बांधिलकी म्हणून फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले.



जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

    रस्त्यांवरील अपघातांच्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असून, सुरक्षित प्रवासासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात येत असल्याचे श्री. चिवटे यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी कौतुक करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्री. सिंह  आणि श्री. चिवटे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ